










जत:( एस.आर्टस् न्यूज प्रतिनिधी)
भारतीय प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिनानिमित्त जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स जत मध्ये माझा देश ! माझे संविधान !चित्र प्रदर्शन -२०२५ भरविण्यात आले होते . या चित्र प्रदर्शनाची संकल्पना व मांडणी श्री. सुभाष शिंदे कलाशिक्षक , स्काऊट मास्टर यांची आहे .शाळेतील विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी ,इयत्ता अकरावी व बारावी मध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सुमारे 200 चित्रे जमा झाली. त्यातून व कलाशिक्षक श्री. सुभाष शिंदे यांच्या कलाकृती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या होत्या .या विविध विषयांवर सर्व गटांमध्ये मांडणी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मांडणी केली होती.
शाळेचे कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांनी निवडक कलाकृतींना आकर्षक मांडणी करून त्यामध्ये विविधता आणली होती .
माझा देश! माझे संविधान !चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मा. डॉ. शंकर तंगडी सेक्रेटरी ,दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. श्री .देवेंद्र पोतदार ,खजिनदार व शाळा समिती अध्यक्ष ,मा. बिजरगी साहेब संचालक, सभासद उपस्थित होते .शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे पी. एम. व पर्यवेक्षक श्री. चौगुले एस. डी. यांचे योग्य मार्गदर्शन लाभले .
या चित्र प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या बक्षीस प्राप्त विद्यार्थी ,विद्यार्थ्यांना भेटवस्तू , प्रमाणपत्र मा. श्री .अजयकुमार नष्टे उपविभागीय अधिकारी जत यांच्या हस्ते देण्यात आली.त्यांनी सर्व कलाकृतीचे अभिनंदन केले . हे प्रदर्शन संकल्पना व मांडणी करणारे श्री .सुभाष शिंदे कलाशिक्षक , स्काऊट मास्टर यांचेही अभिनंदन केले .या चित्र प्रदर्शनाला विद्यार्थी,विद्यार्थिनी ,पालक बंधू -भगिनी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.







