Homeमहाराष्ट्रकला विश्वातील एक माणूस ! श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर

कला विश्वातील एक माणूस ! श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर

. कलेच्या विश्वातील एक माणूस
सुभाष शिंदे सर.
कलेच्या विश्वात जगणारा, वावरणारा साने गुरुजींच्या विचाराचा वारसा नव्या पिढीला देणारा, एक आदर्श, विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून, सुभाष शिंदे सर यांच्याकडे पाहिले जाते. जत हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज जत मधील चित्रकलेचे अध्यापक, उत्कृष्ट छायाचित्रकार, स्काऊट मास्टर, उत्कृष्ट कवी व साहित्यिक अशी ख्याती, श्री सुभाष शिंदे सर यांची आहे. बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे, सन -१९६८ मध्ये एका गरीब कुटुंबात श्री. सुभाष शिंदे सर यांचा जन्म झाला. वडील संगीत प्रेमी व पेटीवादक. पोवाडा या कलाप्रकारात शाहिराला पेटीची साथ देणारे, भजन गाणारे कलाप्रेमी होते. उदरनिर्वाहासाठी माधवनगर सांगली येथे कॉटन मिलमध्ये ते काम करत होते. त्यांना कलेची विलक्षण आवड होती. दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी आपली कला सादर केली. आणि तसाच कलेचा वारसा, श्री सुभाष शिंदे सर यांनी, जोपासला चित्रकलेची विलक्षण आवड असल्यामुळे, बुधगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संपवून, श्री सुभाष शिंदे सर सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय येथे आले. तेथे त्यांनी, कॉमर्स शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले व पुढे कला शिक्षक पदविका सांगली येथे पूर्ण करून मुंबई या ठिकाणी त्याच्या परीक्षा देऊन प्रथम श्रेणीत श्री. शिंदे सर उत्तीर्ण झाले. पुढे नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे शिवसेनेचे मुखपत्र सामना साठी कला विभागात आर्टिस्ट व दैनिक केसरी मध्ये आर्टिस्ट म्हणून काम केले. पुढे शिंदे सर १९९१ मध्ये. दि. फ्रेंडस् असोसिएशन जतचे, जत हायस्कूल जत येथे कला शिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून त्यांच्या अविरत कार्याला सुरुवात झाली. शिंदे सर एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. आपल्या अध्यापन बरोबरच मुलांना गोष्टी सांगणे, त्यांना गाणी म्हणून दाखवणे, त्यांना कविता ऐकवणे, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, त्यांना उत्तम चित्रे काढायला शिकवणे, त्यांच्यासाठी वेगळ्या स्पर्धा घेणे, स्काऊट आणि गाईड या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्वावलंबी बनवणे, असे असंख्य उपक्रम स्काऊट राज्य पुरस्कार प्राप्त अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य सरांनी केले आहे. कब, बुलबुल, स्काऊट, गाईड जिल्हा मेळावा मध्ये गेले नऊ वर्षे अॅड व्सहास पार्टी सदस्य सक्रिय आहेत. स्काऊट, गाईड विविध गाठी व गॉझेट प्रात्यक्षिक जिल्ह्याच्या विविध ठिकाणी व्याख्यान, प्रात्यक्षिके यांनी दिली आहेत. शिंदे सरांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य त्यांना प्राप्त झाला.
शाळेतील अध्यापनाचे कार्य करताना बी.ए. ए.एम. डिग्री घेऊन शैक्षणिक ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न हे विशेष! शाळेच्या फलकावर सुंदर हस्ताक्षरात शिंदे सर लेखन करत राहिले. शाळेत कोणताही कार्यक्रम असो स्टेज सजावट शिंदे सर आवडीने करत राहिले. खरेतर शिंदे सर यांचे कार्य शब्दात मांडणे अवघड आहे.
🔴 श्री.सुभाष शिंदे, सरांना मिळालेले विविध पुरस्कार:
🔘 रचना चित्र (सन-१९८७) राज्य पुरस्कार
🔘 रचना चित्र (१९८७) राष्ट्रीय पुरस्कार
🔘 सांगली जिल्हा एड्स पोस्टर स्पर्धा प्रथम क्रमांक पटकावला.
🔘वन्य सप्ताह निमित्त हस्तलिखित मुखपृष्ठ व आतील रेखाटन जिल्हा व विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
🔘 महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ पुणे यांचे सन्मानचिन्ह प्रदान (सन-२००२)
🔘 सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली यांचा आदर्श स्पर्धा नियोजन पुरस्कार प्राप्त (सन-१९८९-९०)
🔘 जालना जिल्हा रंगभरण चित्रकला स्पर्धा स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान (सन-२००५)
🔘 भारतीय शिक्षण मंडळ सांगली,चैत्र पाडवा भेटकार्ड स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल गौरव स्मृतिचिन्ह पुरस्कार प्राप्त (सन-२००५)
सांगली जिल्हा भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय उपआयुक्त कामकाज पाहिले. ११) महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळ, पुणे येथे कला शिक्षण या पाठय पुस्तकांचे१० वी / १२ वी लेखक / रेखाचित्र काम.
१२. पूज्य साने गुरुजी जन्मशताब्दी निमित्त सांगली जिल्हामध्ये व राज्यामध्ये विविध शाळेमध्ये कथाकथन श्यामची वाटप व साने गुरुजी चित्र प्रदर्शन भरविले. १३. सांगली जिल्हा कब बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यामध्ये अॅडव्हास – पार्टी सदस्य म्हणून कामकाज पाहिले.
🌼नोकरी सुरू तारीख :-०६/११/१९९१ व्यवसाय-कलाशिक्षक पद-सह शिक्षक/कलाशिक्षक
नोकरीचे गाव – जत
अध्यापनाचा अनुभव :- ३० वर्षे
मिळालेली बक्षिसे: वैयक्तिक / कलाशिक्षक : १) राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, नाशिक
२) राज्यस्तरीय साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षक मंडळ, कराड. ३) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ, पुणे, राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार: कलाशिक्षण परीषद, सांगली. ४) भारतीय शिक्षण मंडळ : आदर्श शिक्षक पुरस्कार, जत. ५) ज्ञानेश्वर आदर्श शिक्षक पुरस्कार:अजिंक्यतारा
प्रतिष्ठान, जत.. ६) लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार, जत.
७) कॉलेज ऑफ आर्ट्स सांगली, आदर्श माजी विद्यार्थी: स्मृतिचिन्ह पुरस्कार.
८) सांगली जिल्हा परिषद व सांगली स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय, सांगली.
नऊ वर्षे जिल्हा मेळाव्यात अॅडव्हान्स पार्टी लीडर , कार्यभार: सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र गौरव…
९) सिद्धेश्वर यात्रा कमिटी बुधगाव आदर्श शिक्षक व विविध उपक्रम राबविल्याबद्दल साक्षी चिन्ह देऊन सत्कार. १०) सांगली जिल्हा कलाध्यापक संघ सांगली आयोजित विवी स्पर्धेमध्ये नियोजन केल्याबद्दल अनेक स्मृती चिन्ह प्राप्त.
🔵🔵🔵✍️✍️✍️✍️🔴🟡🟤🟣🟡🔴🔵
💠अध्यापन विषयक राबविले उपक्रम:- १) कला विशेषी अभ्यासक्रम नुसार व्हिडिओ निर्मिती-२४९ Subhash Shinde, Jath यूट्यूब चैनल सुरू आहे.
२) विविध स्पर्धा याद्वारे विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करणे.
३)दिवाळी सुट्टी उन्हाळी सुट्टी या शिबिराचे आयोजन करून कला, नाट्य विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन.प्रेरणा देऊन घेतलेल्या स्पर्धा:
१) देशभक्ती चित्रकला स्पर्धा: सहभागी संख्या -६०
२) कविता लेखन/गायन स्पर्धा: सहभागी संख्या-८०
३) रक्षाबंधन: भेटकार्ड तयार करण्याचा स्पर्धा: -८५
४) वेशभूषा स्पर्धा : -२०
५) घोष वाक्य स्पर्धा : -१५
विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थी विद्यार्थिनींना पारितोषिक प्राप्त.
💠संस्था निर्मिती/ सदस्य-निमंत्रित कार्य:
१) अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई- स्विकृत सदस्य.
२) सांगली जिल्हा स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय,सांगली. – अर्थ विभाग सदस्य
३) सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली-कार्यवाह. ४) साने गुरुजी कथामाला/कला केंद्र, जत: अध्यक्ष
५) लायन्स क्लब जत, सदस्य ते
प्रथम उपाध्यक्ष पदभार पाहिलेला
आहे.
💠🔘💠🔘💠🔘💠🔘💠🔘

💠डॉ.श्रीपाद जोशी (ज्येष्ठ साहित्यिक) स्नेहसंमेलन, कॉलनी विद्य४१६४०४
🔵डॉ.श्रीपाद जोशी ( ज्येष्ठ साहित्यिक ). 💠💠🌼 मनोगत 🌼💠💠
श्री. सुभाष सदाशिव शिंदे हे जत हायस्कूल, जत येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. केवळ कलाशिक्षक ‘ही त्यांची ओळख पुरेशी नाही. ते फोटोग्राफर आहेत. नाट्य कलावंत आहेत. स्काऊट चळवळीतील धडपडणारे कार्यकर्ते आहेत. सानेगुरुजी कथामालेचे प्रचारक आहेत. राष्ट्र सेवा दलातील सैनिक आहेत. ते काय नाहीत? हाच प्रश्न आहे. ते समरसून काम करणारे हाडाचे शिक्षक आहेत.
करी मनोरंजन जो मुलांचे । जडेल नाते प्रभुशी तयाचे असे निर्मळ मनाचे श्री. सुभाष मुलांमध्ये रमून जातात. त्यांना त्यावेळी तान.. भुकेचे भानच राहत नाही. मुलांसाठी समर्पित भावाने काम करणारे श्रीयुत सुभाषराव शिंदे ही जत हायस्कूल ची ओळख आहे. हीच संपत्ती आहे . त्यांच्या कुंचल्यातून मनोहारी चित्रे मिळतात. फोटोग्राफीतून अनमोल प्रसंग सहज टिपले जातात. तर त्यांच्या वाणीतून सानेगुरूजी जणू बोलतात असाच भास होतो. असे श्री. सुभाष शिंदे हे फुलत राहोत . मुलांना रमवत, हसवत राहोत. शाळेत चैतन्य निर्माण करत राहोत त्यांना माझ्या शुभेच्छा !
श्रीपाद जोशी(ज्येष्ठ साहित्यिक)
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨
श्री.सुभाष शिंदे यांना राज्यस्तरीय विविध पुरस्कार:
🔵 राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार -२०२२
संस्था: प्रगती महिला शैक्षणिक सामाजिक विकास संस्था, नाशिक
(रजा.नं. महा. एफ/८४५०/२००५नाशि.
🟡 राज्यस्तरीय : ज्ञानज्योती क्रांतीज्योती पुरस्कार -२०२२: आदर्श कलाशिक्षक , शैक्षणिक प्रबोधन कार्य.
संस्था: भावना बहुउद्देशीय संस्था नाशिक
(संस्था रजा.नं. महा.ध.उ.आ./१४२६ नाशिक -/३०/११/२०१६ पब्लिक ट्रस्ट रजा.नं.महा./एफ१८२३. ६/७/२०१७
🟤 मराठी भाषा राज्य शिक्षक पुरस्कार -२०१२
संस्था: अकादमी कला दालन रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई
(मराठी राज्यभाषा दिनी: रविवारी दि.२७फेब्रुवारी २०२२.
🔴 राज्यस्तरीय साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार – २०१४
संस्था: शिक्षण मंडळ कराड कराड
(शनिवार,दि.१२जुलै २०१४.
🟣 शिवराज्याभिषेक विश्वविक्रम रांगोळी उत्सव समिती, सांगली.
श्री.कलाश्री श्री.सुभाष शिंदे, रजिस्टर नं.91
(रजी.SNG/00031/41C/19)
🟡विविध विश्वविक्रम पुरस्कार प्राप्त!
१) ग्लोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
२) आसाम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
३) एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
४) नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
५) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
६) युनायटेड किंग्डम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
🟣 राज्यस्तरीय समाज प्रबोधन आदर्श शिक्षक पुरस्कार
संस्था: युवा शक्ती सामाजिक संस्था
(रजा.नं महा./८६३५/०४/नाशिक)
🟡🟣🔴🟤🔵🟡🟣🔴🟤🔵🟡🟣🔴🟤
मी विद्यार्थी दशे पासून आज त्यांच्यासोबत काम करत असताना पर्यंत जे पाहिले ते मांडले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने श्री सुभाष शिंदे सर यांच्या हातून असेच शैक्षणिक कार्य घडो, त्यांना उत्तम आरोग्य आनंद, समाधान लाभो हीच शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभकामना
🔴🔴🔴🔴🔴🔴🔵🔵🔵🔵🟤🔵🔴🟣
🔵लोकमत 💠व्हरायटी
💠सोमवार, दि. २ ऑगस्ट, २०१० 🔘पान-८
कला ही मागून मिळत नसते.
ती विकतही घेता येत नाही. कला शिकण्यासाठी कलेबद्दल मनात भक्ती असावी लागते. ‘कला देवीचा साक्षात्कार होण्यासाठी कलाकाराकडे सच्चे जिगर असावे लागते. शालेय जीवनातच चित्रकलेशी मैत्री करून कलाविश्वात आपला वेगळाच ठसा उमटविणारा एक अवलिया जतमध्ये वावरत आहे. कलेला परमेश्वर मानून तिची पूजा करणान्या त्या सच्चा कलाउपासकाचे नाव आहे ‘सुभाष सदाशिव शिंदे.
सुभाष शिंदे हे सध्या जतमधील दि फ्रेन्डस् असोसिएशनच्या जत हायस्कूलमध्ये कलाशिक्षक’ म्हणून कार्यरत आहेत. जिद्द, आत्मविश्वास व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कला क्षेत्रात गरुडभरारी घेतलेल्या आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती शिंदे यांचे मार्गदर्शक डॉ. श्रीपाद जोशी अभिमानाने सांगत होते. ते पुढे म्हणाले, सुभाषचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण बुधगावमधील बुधगाव हायस्कूलमध्ये झाले. सुभाषला लहानपणापासून चित्रकलेबद्दल विशेष आकर्षण होते, त्याचे वडील हार्मोनियमवादक होते. त्यामुळे बालपणापासूनच सुभाष कलेच्या वातावरणात वाढत होता सुभाष’ चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण
🔘🔘🔘🔘🔘
कलेचा सच्चा उपासक
💠🌼💠🌼💠
शिक्षक म्हणून
एकदा नोकरी मिळाली
की बऱ्याचवेळा
कलाशिक्षकांचे खडू, फळा, पेन्सील
कॅनव्हास व रंगांशी
असलेले नाते तुटत
💠✍️💠✍️💠🌼🌼🌼🌼
विद्यार्थ्याचे नाव सुभाष शिंदे , शिक्षण: ए.टी.डी,ए.एम
(कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत)
शिक्षकांचे नाव: डॉ.श्रीपाद जोशी
✍️💠✍️💠✍️🌼🌼🌼🌼🌼
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1764931297.475c394c Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1764927814.472dbefd Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1764926422.2d849bd0 Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1764924546.699d14bd Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1764923388.697e3a2d Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1764931297.475c394c Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1764927814.472dbefd Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1764926422.2d849bd0 Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1764924546.699d14bd Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1764923388.697e3a2d Source link
error: Content is protected !!